Duration 4:5

कोरोना (एक अदृश्य शक्ती) आणि मानव Corona virus Marathi Poem, coronavirus 2020 Corona virus Kavita

Published 3 Jul 2020

*कोरोना (एक अदृश्य शक्ती) विरुद्ध मानव* कोरोना व्हायरसच्या शक्तीपुढे, पुरते आम्ही झुकलो, कोरोनामुळे आम्ही सर्व, एवढे मात्र शिकलो || धृ || झाली संचारबंदी, कर्फ्यु आणि लॉकडाऊन, होम कॉरंटाईन झालो, भयभीत आम्ही राहून, मृत्यूच्या या संकटापायी, शासनाचे आम्ही ऐकलो || १ || नोकरी धंदे सोडले, जीणे जिकीरीचे झाले, स्वप्नी नाही पाहीले, असे वाईट दिवस आले, काटकसर आणि बचत आता, आम्ही करीत बसलो || २ || स्वच्छतेचे महत्व आता, आम्हाला लागले कळू, विषाणूं आणि किटानुंपासून, लागलो दूर पळू, सारखे सारखे आता आम्ही, हात धुवू लागलो ||३|| कोरोनापुढे बाकी आजार, छोटे वाटू लागले, होऊनिया बेजार, ते आम्ही अंगावरी काढले कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती, वाढवायला लागलो || ४ || व्यसन मुक्तीचे प्रयत्न आम्ही, केले नानापरी, कोरोनाने हे करून दाखवले, जादू केली खरी, वाईट सवयी आणि व्यसनाला तूर्तास तरी मुकलो || ५ || भेटीनंतर हस्तांदोलन, हि नाही आपली संस्कृती, का अवलंबली आपण हि, विदेशी विकृती, नमस्कारासाठी आता आम्ही, हात जोडू लागलो || ६ || थोडे अंतर जाण्यासाठी, गाडी आम्हाला लागायची, उम्मेद आता वाढली, स्वबळावर जगण्याची, शेकडो मैल चालून सुद्धा, जराही नाही थकलो || ७ || अश्याच राहूदे चांगल्या सवयी, अखंड आमच्या जीवनी, हीच प्रार्थना तुला ईश्वरा, विनवू तुजला कर जोडुनी, तेव्हाच वाटेल आम्हाला, खरंच आम्ही जिंकलो || ८ || काव्य रचना : अनिल टेमकर. Background Music : https://www.purple-planet.com Music : Youtube music library #Corona_Virus_Poem #Corona_virus_song #Corona_virus2020 #coronavirus_poem_Marathi #corona_virus #corona_virus_Status Disclaimer - Video is for Entertainment purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Category

Show more

Comments - 0